Mission Vision

स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहणेसाठी रोजगार निर्मिती करणे आणि रोजगारासाठी आवश्यक ती मदत करणे.

अनाथ व गरीब मुलांना शिकण्यास प्रोत्साहन देणे व त्यांना शिकण्यासाठी योग्य ती मदत करणे.

तरुण पिढीला व्यसनांपासून दूर राहणेसाठी वेळोवेळी व्यसन मुक्ती कार्यक्रम घेणे व त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन समाजात त्यांना मानाने जगण्यास शिकवणे.

वयोवृद्ध व आजारी लोकांवर योग्य ते उपचार करणेसाठी वृद्धाश्रम स्थापना करणे व त्यांना आपुलकीचा आधार देऊन त्यांच्या मध्ये आपले पणाची भावना निर्माण करणे.

निसर्गाकडून आपल्याला बरेच काही मिळत असते. त्याचेही आपण काही देणे लागतो ह्या भावनेतून वृक्षारोपण करणे, त्यांची निगा राखणे, परिसर स्वच्छ रहावा यासाठी जनजागृती करणे व त्याचे महत्व समाजापर्यंत पोहचवणे.

अशा विविध मार्गातून काम करत राहून समाजाला मदत करणे, सामाजिक सुधारणा व स्वच्छता मोहीम यावर भर देणे. व गरजू लोकांना मदतीस नेहमी तत्पर असणे हेच आमचे ध्येय असणार आहे.