मनोगत

या संस्थेची सुरवात आम्ही दि.२३/११/२०१० रोजी केली. आम्ही नावाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची उद्दिष्टे मनात ठेऊन या संस्थेची स्थापना केली.खरेतर मी मागे वळून पाहताना सर्व दिवस आठवतात. घरातील आर्थिक परिस्थिती मुळे 4 थी च्या पुढील शिक्षणास मी वंचित राहिलो. त्याची खंत अजूनही माझ्या मनात आहे . पण मी अशिक्षित असलो तरी माझ्या आयुष्यात खूपच शिकलेले मोठ्या हुद्दयावर असणाऱ्या लोकांचा सहवास मला लाभला . त्यासाठी परमेश्वराचे आभार मानावे तेवढे थोडच आहेत. माझ्या आयुष्यावर सर्वात प्रभाव टाकणारी व्यक्ती म्हणजे मैत्रेय उद्योग परिवाराचे संस्थापक कै.मधुसुदन रमाकांत सत्पाळकर व श्री लक्ष्मीकांत नार्वेकर त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या ध्येयाने प्रेरित होऊनच मला सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. मी फार शिकू शकलो नाही तरीही मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कशी मदत करता येईल या विचाराने संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत ३५ जिल्हा परिषद शाळांमधून जवळ जवळ ३,००,००० वह्या पुस्तकांचे वाटप केले आहे. आणि हेच काम मला महाराष्ट्राच्या प्रत्येक जि.प. शाळेपर्यंत पोहोचवायचे आहे. त्याचबरोबर संस्थेमार्फत आरोग्य शिबिरे , रक्तदान शिबीर , नेत्र तपासणी शिबीर, वृक्षारोपण याचेही आयोजन वेळोवेळी केले जाते.
मी डॉ. डी. आर. कुलकर्णी, तांदुळवाडी यांचे दवाखान्यात मी जवळजवळ १८ वर्षे काम केले . मला घडवण्यास डॉ.दत्तात्रय कुलकर्णी सरांचा व त्यांचे बंधू कुमार कुलकर्णी सर यांचा सिंहाचा वाटा आहे. या संस्थेस आर्थिक पाठबळ श्री राहुल नानासाहेब महाडिक सर (जि.प.माजी सदस्य व्यंकटेश्वराशिक्षण समूह सचिव ), देसावळे मामा (आदर्श करिअर अॅकॅडमी बहादुरवाडी) आणि मैत्रेय चे टॉप सिनीअर श्री मनोहर मेहरे यांचे खूप मोठे योगदान लाभले. आता नांदा सौख्य भरे ह्या विवाह विषयक तसेच नोकरी संदर्भ, शेतीविषयक मार्गदर्शन,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ,व्यसन मुक्ती या वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमचे समोर येत राहूच . लोभ आहेच तो वृद्धींगत व्हावा हीच अपेक्षा .
आपला
बापुसो कांबळे.

Today we feel very happy to dedicate our new website www.bapusoseva.com in your service. Bapuso Bahuuddeshiya Seva Sanstha is an organization established in 2010, with the sole intention of upliftment of the poor, unemployed, widows, old age persons of the society. Our trust carried various programs like notebook, schoolbooks distributions, school dress distribution in various Zilha Parishad Schools. Till date we have distributed nearly about 300000 notebooks, schoolbooks in various schools. And it is our aim to reach every ZP school in the jurisdiction of Maharashtra in the next 2 or 3 years. Besides that, we have organized free health checkup camps, blood donation camps a number of times.
Today we are also launching our new Matrimony portal ‘NANDA SOUKHYA BHARE’ aiming to help youths of all religion, cast, to find their suitable soul mate.
We are also planning to organize various camps which will helpful for unemployed youth, farmers and women also.
I am confident that you all will stay behind us; support us in this mission too.
Thanking you,
Bapuso kamble.